केसरकर-राणेंचा वाद शिगेला; एकमेकांची काढली लायकी

केसरकर-राणेंचा वाद शिगेला; एकमेकांची काढली लायकी

मुंबई l Mumbai

राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नवीन सरकार अस्तित्वात आलं आहे. शिंदे गट आणि भाजपाचं सरकार म्हणजे नैसर्गिक युती असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे.

याच दरम्यान आता शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षात (BJP) वादाची ठिणगी पडली आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी निलेश राणे आणि दीपक केसरकर यांनी एकमेकांची लायकी काढली आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप करत नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यास पवारांनी मदत केली असल्याचे म्हटले आहे. तसेच राणेंनी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलू नये, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला होता.

दीपक केसरकर (deepak kesarkar) यांनी केलेल्या वक्तव्याला निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विट करत केसरकर यांच्यावर टीका केली, आपल्या ट्विचमध्ये निलेश राणे यांनी म्हटलंय, दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. २५ दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात, हे विसरू नका, असा इशारा निलेश राणे यांना दिला.

त्यानंतर दीपक केसरकर यांनी पुन्हा पलटवार केला आहे. निलेश राणे हे वारंवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात, भाजपकडून ठाकरे घराण्यावर कोणीही टीका करणार नाही. असं आमच ठरलं आहे, त्यांनी दहा वेळा टीका केली तर मी दहा वेळा बोलणार, माझ्या वयाच्या निम्म्या वयाची राणे यांची मुलं आहेत. म्हणून मी त्यांना लहान म्हटलं आणि मला तसं म्हणण्याचा अधिकार आहे, असं सांगत केसरकर यांनी राणे यांना कोकणी जनतेने त्यांची यापूर्वीच लायकी दाखवली आहे अशी बोचरी टीकाही केली आहे.

दरम्यान भाजपा नेते निलेश राणे यांनी व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “दीपक केसरकर, आपण अलायन्समध्ये आहोत, हे विसरू नका. अलायन्स टिकवण्याची जबाबदारी जेवढी आमच्यावर आहे, तेवढीच जबाबदारी तुमच्यावर देखील आहे. तुम्ही शिंदेसाहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे, त्यामुळे तुम्ही कशाला उड्या मारता? मतदारसंघात तुमची काय अवस्था आहे, हे आम्हाला माहीत आहे.

तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत. त्या कुबड्यावर तरी व्यवस्थित चाला, नाहीतर मतदार संघात तुमचा विषय आटोपला होता. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे, हे विसरू नका. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे, आम्ही काही गप्प बसणार नाही,” अशा शब्दांत निलेश राणे यांनी केसरकरांना इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com