केंद्रातील सरकार बरखास्त करुन मतपत्रिकेवर निवडणुका घ्या!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपला प्रतिआव्हान
केंद्रातील सरकार बरखास्त करुन मतपत्रिकेवर निवडणुका घ्या!

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाविकास आघाडीचे सरकार Government of Mahavikas Aghadi बरखास्त करुन पुन्हा निवडणुका घ्या, या भाजपच्या आव्हानाला BJP's challenge काँग्रेसनेही मंगळवारी प्रतिआव्हान दिले. Congress also issued a counter-challenge on Tuesday. भाजपमध्ये हिम्मत असेल तर केंद्रातील सरकार बरखास्त करुन central government मतपत्रिकेवर निवडणुका Elections on the ballot घेऊन दाखवा, असे प्रतिआव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress State President Nana Patole यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते सैरभैर झाले आहेत. दोन वर्ष हे सरकार पाडण्यासाठी भाजपने वारंवार प्रयत्न केले, राजभवनाच्या माध्यमातून प्रयत्न करुनही काही उपयोग झाला नाही.

सीबीआय, ईडी, आयकर, एनसीबी सारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातूनही मविआ सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. तरीही सरकार पडत नाही, उलट ते भक्कम झाले आहे हे पाहून भाजपा नेत्यांना नैराश्याने ग्रासले आहे. या नैराश्येतूनच महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्याची भाषा केली गेली, अशी टीका पटोले यांनी केली.

भाजप एसटी कर्मचाऱ्यांचे नुकसान करत आहे. भाजप सत्तेत असताना एसटी विलिनीकरणाविरोधात भूमिका घेतली होती. केंद्रात सत्तेत असलेले भाजपचे सरकार एलआयसी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, भेल, अशा सरकारी कंपन्या उद्योगपतींना विकत आहे. येथे मात्र एसटीचे विलिनीकरण करण्याची भूमिका घेत आहे. ही भाजपची भूमिका दुटप्पी आहे, असे नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com