Saturday, April 27, 2024
Homeराजकीयदिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले; चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले; चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

पुणे |प्रतिनिधी| Pune

दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले याचे सत्य येत्या ७ मार्चनंतर बाहेर येईल. याबाबत काहीही राजकारण होत नाही. ७ मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध – पानी का पानी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यानी केल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

आतापर्यंत केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री आणि नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे हेच दिशा सालियन प्रकरणावर वारंवार बोलत होते. आता थेट चंद्रकांत पाटील यांनीच या प्रकरणावर भाष्य केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात ७ मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल. महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या