मुंबई -

काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख नसीम खान यांनी येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले असले

तरी यावरुन राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भाई जगताप आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेगवेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुक स्वबळावर होणार की महाविकास आघाडी एकत्र लढणार हा पेच अद्यापही कायम आहे. त्यातच, काँग्रेस नेत्यांमधील निवडणूकीवरून सुरू असलेले मतदभेद समोर येताना दिसत आहेत. नवनियुक्त मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस पक्ष मुंबईतील 227 वार्डाची तयारी पूर्ण करत असून निवडणूक स्वतंत्र लढवावी अशी भूमिका घेतली आहे. मात्र, त्याच वेळी राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी वेगळी भूमिका मांडली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्रित आहेत. महापालिका निवडणुकीला अजून वेळ आहे. भाई जगताप अग्रेसर नेते आहेत. संघटनात्मक काम चांगले आहे. काँग्रेस पक्ष सर्व वार्डाची तयारी करत असला तरी एकत्रित निवडणूक म्हणून काँग्रेस,शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक लढविण्यासबाबत आता लगेच निर्णय घेता येणार नाही. भविष्यात निर्णय घेऊ अशी सावध भूमिका थोरात यांनी घेतली आहे.

नवनियुक्त जगताप आणि प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्यातील मुंबई काँग्रेसच्या निवडणकी बाबतची भूमिका एकमेकांच्या विरोधात असल्याने दोन्ही नेते यावरून वेगळ्या भूमिका मांडत आहे अशी चर्चा आता रंगली आहे.