अनिल परबांना धक्का! ED नं जप्त केली कोट्यवधींची संपत्ती

अनिल परबांना धक्का! ED नं जप्त केली कोट्यवधींची संपत्ती

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसुली संचालनालयानं (Directorate of Enforcement) दणका दिला आहे. ईडीकडून (ED) अनिल परब यांच्याशी निगडीत १० कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort case) ईडीने मनी लॉन्डिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अनिल परब यांची वारंवार चौकशी झाली. जवळपास चार ते पाच दिवस ही चौकशी झाली होती. साई रिसॉर्टशी संबंधित १० कोटी २० लाखांची संपत्ती जप्त केली आहे. यात साई रिसॉर्टसह अन्य ठिकाणच्या मालमत्तेचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com