ठाकरे गटाला आणखी एक धक्का! दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

ठाकरे गटाला आणखी एक धक्का! दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

दिपाली सय्यद यांनी स्वत: आपल्या प्रवेशाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर दिपाली सय्यद यांनी हे मोठं विधान केलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी आपण स्वीकारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी रश्मी ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे, नीलम गोऱ्हे यांच्यावरही टीका केली. संजय राऊतांना जी शिक्षा झाली ती त्यांच्या पापाचीच शिक्षा आहे. पक्ष तोंडाने कसा फोडला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण ते आहेत. हळहळू गोष्टी घडत गेल्या त्यामुळे दोन गट झालेत. शिंदेंनी मला शिवसेनेत आणलंय त्यामुळे त्यांच्यासोबत उभं राहणं आपलं कर्तव्य असल्याचं त्या म्हणाल्या.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील खोके येणं बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना वाटत आहे. निलम गोऱ्हे म्हणा किंवा सुषमा अंधारे म्हणा या सगळ्या चिल्लर आहेत. यांच्यापेक्षा सगळ्या महत्त्वाचा दुवा आहे, सूत्रधार आहेत त्या रश्मी वहिनी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

वाद हा मोठ्या पातळीवर होतो, मुंबई पालिका जेव्हा आपल्याकडे कशी येईल, सातत्यानं खोके खोके म्हटलं जातं खोके कोणाकडे आहेत, मुख्य सूत्रधार कोण आहे हे कळलं पाहिजे, कुठे कोणत्या गोष्टी पोहोचल्या जातात हे कळलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com