Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याVidhan Parishad Election 2023 : पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ...

Vidhan Parishad Election 2023 : पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?; माजी गृहमंत्र्यांनी भाजपला डिवचलं

मुंबई | Mumbai

शिक्षक-पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) आधीच राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोट्स’ (Operation Lotus) सुरू झाल्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी अद्याप काही दिवसांचा अवकाश आहे.

- Advertisement -

मात्र, असं असलं तरीही फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी नाशिक मतदारसंघात (Nashik Constituency) जे काही राजकीय नाट्य पाहायला मिळालं. त्यावरुन भाजपने (BJP) महाराष्ट्रात काँग्रेसला (Congress) दणका देण्यासाठी सॉफ्ट ऑपरेशन लोट्स सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse Patil) यांनी भाजपवर बोचरी टीका केली आहे.

‘भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही. पाकळ्या मिटून घेण्याचं हे नवं ऑपरेशन कमळ म्हणावं का?’ असं ट्विट वळसे पाटील यांनी केलं आहे. दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपने अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कुणालाही दिला नाही किंवा अधिकृत उमेदवारही घोषित केला नाही असे ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. आज सकाळीच हे ट्वीट करत दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला आहे.

नाना पटोले सत्यजित तांबेंवर आक्रमक

“आम्ही पक्षाकडून डॉ, सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. पण डॉ. सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता एकप्रकारे पक्षासोबत फसवेगिरी केली. आपल्या मुलाचा अपक्ष फॉर्म भरून भाजपा पाठिंबा असल्याचे दर्शवले. कारण तांबे यांनी सांगितले की आम्ही भाजपाचा पाठिंबा घेणार हे एकप्रकारे काँग्रेसला धोका दिल्यासारखे आहे. त्यामुळे याबाबत हायकमांडला माहिती देण्यात आली आहे. आज यावर हायकमांड निर्णय घेणार असून, त्यांच्या निर्णयानंतर कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू. परंतु, बडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही”, असे नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशने महत्वपूर्ण भूमिका घेत दिल्ली हायकमांडकडे कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली आहे. नाशिक निवडणुकीत नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती हायकंमाडला देण्यात आली आहे. सत्यजित तांबे यांना उमेदवारी काँग्रेस कडून पाहिजे अशी कोणतीही मागणी नव्हती. मात्र सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षाने उमेदवारी फॉर्म हा कोरा दिलेला होता. त्यामुळे सुधीर तांबे यांना निवडणूक लढवायची नव्हती, तर सत्यजित तांबे यांचेही नाव टाकण्यास पक्षाची हरकत नव्हती, अस कांग्रेसच्या एका मोठया नेत्याने म्हटलं आहे. तांबे कुटुंबीयांनी अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिल्लीतील हाय कमांडकडे करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या