Friday, April 26, 2024
Homeराजकीयनवीन कृषी कायदे भाजपा नेत्यांना तरी कळले काय ?

नवीन कृषी कायदे भाजपा नेत्यांना तरी कळले काय ?

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

केंद्राने लागू केलेले कृषी कायदेच मुळात भाजपा नेत्यांसह या कायद्यांवर भाष्य करणार्‍यांना समजलेले नाहीत.

- Advertisement -

देशाच्या सर्वोच्चस्थानी असलेले पंतप्रधानच दिशाभूल करीत असेल तर या देशातील 130 कोटी जनतेचे भवितव्य काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केला. भाजपा दगलबाज आणि फसवणुकीचे राजकारण करीत असल्याचे राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

श्री.गोटे यांनी आज मल्हार बागेत पत्रपरिषद घेवून कृषी विधेयकाबाबत आपली मते व्यक्त केली. ते म्हणाले, राजधानीच्या सिमेवर दीड कोटी शेतकरी, एक लक्ष वीस हजार टॅक्टर घेवून रक्त् गोठवणार्‍या थंडीत जीवाची पर्वा न करता गेल्या महिनाभरापासून ठाण मांडून बसले आहेत.

कष्टाने पिकविलेल्या शेती उत्पादनास रास्त भाव मिळावा यासाठी बसलेल्या भारत मातेच्या या सुपूत्रांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या अंगावर अतिशय निर्दयतेने थंडगार पाण्याचे फवारे मारले जात आहेत.

मोदी-शहा यांच्या सरकारचे शेतकर्‍यांना त्यांच्या निश्चयापासून विचलीत करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. देशातील प्रसिध्दीमाध्यमांची भूमिका सुध्दा चिंताजनक अशीच आहे.

रक्त कडाक्याच्या थंडीमुळे आजपर्यंत 42 शेतकर्‍यांना या सरकारच्या अहंकारी भूमिकेमुळे आपले प्राण गमवावे लागले. सत्यस्थिती नाकारता येणार नाही.

शीख समाजाचे संत बाबा रामसिंग यांनी तर त्यांच्या डोळयांदेखत शेतकर्‍यांचे होत असलेले हाल सहनशिलते पलीकडचे असल्यामुळे केंद्र सरकार आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याबद्दलची चिठ्ठी लिहून स्वत:च्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करुन घेतली.

देशप्रेमाचा कायम उमाळा आल्याप्रमाणे देशभक्तीचे गोडवे गाणारे भाजपावाले किती बेगडी व ढोंगी आहेत हे सिध्द झाले.

अन्नदात्या शेतकर्‍यांना पाकिस्तानी-चिनी-आतंकवादी संबोधने हे कुठल्याही सुसंस्कृत नागरीकास शोभा देणारे नाही. महाराष्ट्रात रावसाहेब दानवे यांच्याइतके विनोदी दुसरे कुणीच नाही.

आंदोलक शेतकर्‍यांमागे चीन व पाकीस्तान असल्याचे संतापजनक वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा हे याबाबत गप्प का? नेमका हा कायदा आहे तरी काय? हे अत्यंत सोप्यातल्या सोप्या भाषेत देशातल्या अगदी अशिक्षीत शेतकर्‍याला सुध्दा कळेल अशा शब्दात शेतकर्‍यांना कुणी समजावून सांगितला नाही.

उलटपक्षी सत्तेतील सरकारपक्ष अत्यंत संयमी व शांततापूर्ण आंदोलन मोडून काढण्याची सुपारी घेवून समाजात गैरसमज पसरविण्याच्या व खोटारडेपणाचे कारस्थान उघड झाले असल्याचा आरोपही श्री.गोटे यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या