Friday, April 26, 2024
Homeराजकीयसत्ताधार्‍यांच्या दबावाखाली भ्रष्टाचारावर पांघरुन

सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली भ्रष्टाचारावर पांघरुन

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेतील तिर्थक्षेत्र विकास कामे असो की, शेषफंडातील कामे यात गैर व्यवहार झाल्याची पुराव्यानिशी तक्रार केली आहे.

- Advertisement -

सभेत गाजावाजाही केला, तरीही उपयोग होत नाही. सत्ताधार्‍यांच्या दबावाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. या जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप जी.प.चे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केला.

जि.प.तील भ्रष्टाचाराबाबत आज त्यांनी पत्रपरिषद घेवून जिल्हा परिषदेच्या कारभारा विषयी पुन्हा संशय व्यक्त केला.

श्री. सोनवणे म्हणाले, जि.प. सदस्य सुनित सोनवणे यांनी तिर्थक्षेत्र विकास कामे व शेषफंडातील कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे 5 ऑगस्ट रोजी झालेल्या सभेत तक्रार केली.

सत्ताधारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दुर्लक्ष केली म्हणून स्मरणपत्रेही दिली. स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणासाठी आलेले पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनाही निवेदन दिले.

पालकमंत्र्यांनी तक्रारदारांना सोबत घेवून समिती गठीत करुन 15 दिवसात चौकशीचे आदेश दिलेत. मात्र आता महिना उलटला चौकशी समितीने याप्रकरणांची सारवा सारव करुन चुकीचा अहवाल सादर केला.

तक्रारदारांना सोबत तर घेतले नाहीच परंतु ज्यांच्यावर आरोप होते त्यांनाच सोबत घेवून चौकशी केली. तरीही आपण संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून दाखविल्याशिवाय अहवाल सभेत सादर करु नये अशी विनंती केली.

परंतु 23 सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत अचानक हा अहवाल सादर करण्यात आला. तो पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप शानाभाऊ सोनवणे यांनी केला.

मुडावद व देवाचे विखरण येथील पत्री बाकडे, निमगुळ पासून 1 कि.मी. अंतरावर असलेला रस्ता, धावरे येथील आरोग्य उपकेंद्र व निवासस्थानाचे बांधकाम अशा काही कामांची उदाहरणे त्यांनी या पत्रपरिषदेत दिली.

मर्जीतल्या व्यक्तींना कामाचा ठेका मॅनेज करुन दिला जातो. असे सांगतांना विद्यमान उपाध्यक्षा कुसुंमबाई कामराज निकम यांचा मुलगा स्वप्नील निकम यास हातनूर रस्ता दुरुस्तीची वर्कऑर्डर देवून काम करण्यात आल्याचा आजच्या पत्रपरिषदेत करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या