Friday, April 26, 2024
Homeराजकीय61 ग्रामपंचायतींवर काँग्रेसची एकहाती सत्ता

61 ग्रामपंचायतींवर काँग्रेसची एकहाती सत्ता

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शिरुड, कापडणे, नेर, सोनगीर, विंचूर या मोठ्या ग्रामपंचायतीत भाजपाचा पराभव करून आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पॅनलने धुळे तालुक्यात 61 ग्रामपंचायतींवर एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे धुळे तालुक्यावर आ.कुणाल पाटील यांचेच निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

- Advertisement -

सकाळी निकाल घोषित होताच कार्यकर्त्यांनी आ.कुणाल पाटील यांच्या शहर कार्यालयासमोर आ.पाटील यांना खांद्यावर घेत गुलालाची उधळण करीत फटाक्यांच्या अतिषबाजीत ढोल आणि घोषणांच्या गजरात विजयी जल्लोष साजरा केला.

ग्रामपंचायत निकालांमुळे भाजपाचे सभापती बापू खलाणे, पं.स.सभापती प्रा.विजय पाटील, जि.प.सदस्य राम भदाणे, शंकर खलाणे, भाजपाचे ज्येष्ठ नेते गजानन पाटील यांना काँग्रेसने धुळ चारली आहे.

धुळे तालुक्यात 72 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यापैकी सहा ग्रामपंचायतींवर आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पॅनलने बिनविरोध सत्ता मिळविल्याने 66 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. या ग्रामपंचायतींच्या निवडणकीचा आज निकाल जाहिर करण्यात आला.

धुळे तालुक्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजपा असा सामना रंगला होता. भाजपाच्या पॅनलचा पराभव करून आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने एकतर्फी विजय मिळविला. त्यामुळे पुन्हा धुळे तालुक्यात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला.

एकूण 72 ग्रामपंचायतींपैकी 65 ग्रामपंचायतींवर आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळविला आहे, त्यात शिरुड, कापडणे, नेर, सोनगीर, विंचूर, नांद्रे, निकुंभे, तरवाडे, भिरडाई-भिरडाणे, आंबोडे, बोरसुले, चिंचखेडे, पिंपरखेड, दह्याणे, मोरदडतांडा, दोंदवाड, गरताड, बांबुर्ले, गोंदूर, मोहाडी प्र.डा., कापडणे,खंडलाय खु.,अंचाळे, सरवड, मोराणे प्र.नेर, खंडलाय बु., धामणगाव, कुंडाणे वे., जुनवणे, देऊर खु.,बाबरे, बेंद्रेपाडा, नरव्हाळ, वडजाई, मोघण, मोरशेवडी, सायने, पाडळदे, सडगाव, वेल्हाणे, लळींग, शिरधाणेप्र.नेर, कुंडाणेतांडा, निमखेडी, वणी बु., सावळदे, सोनेवाडी, लोहगड, बिलाडी, लोणखेडी, पुरमेपाडा, बल्हाणे, मोरदड, चौगाव, अजंग या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

तसेच आमदड, दापुरा, बोरविहीर, सांजोरी, चिंचवार, रामी या ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बिनविरोध होवून सत्ता मिळवली होती.तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीनही पक्षांच्या आघाडीने बोरीस, उडाणे, नवलाणे, अजनाळे, सावळी या ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.

माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आ.कुणाल पाटील यांनी शहर कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार केला. यावेळी कृऊबाचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ.दरबारसिंग गिरासे, माजी पं.स.सभापती बाजीराव पाटील, गुणवंत देवरे, कृऊबाचे उपसभापती रितेश पाटील, पं.स.चे गटनेते पंढरीनाथ पाटील, अशोक सुडके, बापु खैरनार, गणेश गर्दे, हर्षल साळुंके हेे उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या