धुळे - Dhule - प्रतिनिधी :

मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष,माजी नगरसेवक मनोज मोरे व संजय वाल्हे यांसह तरुणांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

उत्तर महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन सचिन बडगुजर, बाळू आगलावे यांनीही यावेळी शिवबंधन बांधले. प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मनोज मोरे यांच्यासह सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वर्षा बंगल्यावर प्रवेश करतांना धुळे, नंदूरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, आ. सौ.मंजुळा गावीत, महिला जिल्हा संपर्क संघटक प्रियंका घाणेकर, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, डॉ.तुळशीराम गावीत, भटू गवळी, कुणाल पवार, कुणाल कानकाटे, सुयोग मोरे, केशव माळी आदी उपस्थित होते.