Monday, April 29, 2024
Homeराजकीयभाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष

भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष

दोंडाईचा – Dondaicha – प्रतिनिधी :

भाजप हा पक्ष इतर पक्षांपेक्षा वेगळा असून हा पक्ष कोण्या एका व्यक्तीचा, एका परिवाराचा पक्ष नसून हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे.

- Advertisement -

तो एका विचारावर चालतो तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष हा भाजपा आहे. असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांनी केले.

दोंडाईचा येथे भारतीय जनता पार्टीच्या शिंदखेडा व दोंडाईचा मंडळाच्या एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आ. रावल यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी ते उपस्थित होते. यावेळी खा.डॉ.सुभाष भामरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस डी. एस. गिरासे, सरचिटणीस भाऊसाहेब देसले, तालुकाध्यक्ष प्रा.रमेश खैरनार, कामराज निकम, दोंडाईचा मंडळ अध्यक्ष प्रवीण महाजन, उपनगराध्यक्ष रवी उपाध्ये, दत्तात्रय चौधरी, हर्षल विभांडीक, अरविंद जाधव, विजय देसले आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ. रावल म्हणाले की, भारतीय राजकारणात कोणताही पक्ष डोळ्यासमोर ठेवला तर त्या पक्षाचा प्रमुख एक व्यक्ती असतो आणि त्यानंतर त्याचा मुलगा प्रमुख असतो.

परंतु भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे की, जो एका व्यक्तीचा, एका परिवाराचा पक्ष नसून सर्व सामान्यांचा पक्ष आहे.

यात होणारे अध्यक्ष किंवा उच्चपदस्थ व्यक्ती हे सर्व सामान्यच असतात. हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष असुन सर्वसामान्यांचे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष हा भाजपा आहे.

इथे सर्वसामान्यांना न्याय मिळत असतो. या पक्षाला एक विचार आहे आणि तो विचार आपल्या सर्वाना पुढे न्यायचा आहे. असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या