करोनाच्या सुविधांबाबत भाजपच्या खासदार, आमदारांचा जिल्हाधिकार्‍यांवर रोष

jalgaon-digital
2 Min Read

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट, पुरेसे रेमडे सिविर, आणि राज्य सरकारची तिसर्‍या लाटेसाठी अपूर्ण तयारी याबाबत धुळे जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यावर रोष व्यक्त केला आहे.

खा.डॉ.सुभाष भामरे, माजी आ.जयकुमार रावल, शिरपूरचे आ.काशीराम पावरा, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, अनुप अग्रवाल, मनोहर भदाणे, मोहन सूर्यवंशी, बबन चौधरी, कामराज निकम, राजेंद्र देसले, अरविंद जाधव, बापू खलाने, यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.

जिल्हाधिकारी म्हणून आपण शासनाचे प्रतिनिधित्व करतात, आमच्या सर्व भाजपच्या लोकप्रतिनिधी च्या भावना या राज्य शासनाकडे पोहचवू जिल्ह्यातील रुग्णांची सोय करावी, आरोग्यमंत्री राजेश टोपे जे काही सांगून गेले त्यातून कोणत्याही गोष्टीची पूर्तता झाली नाही,

ऑक्सिजन प्लांट उभारण्याबाबत मागणी करूनही कार्यवाही झाली नाही, शिंदखेडा तालुक्याचे ठिकाण असताना ऑक्सिजनची सुविधा देण्यात येत नाही, खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन पुरवठा बंद झाला आहे त्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने तातडीने करावी,

अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे लोकप्रतिनिधीनी चर्चा केली राज्य शासनाने धुळे जिल्ह्यासाठी रेमडे सिविर चा केवळ 1 टक्के कोटा ठेवला असल्याने संपूर्ण जिल्ह्यात टंचाई जाणवत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.

यावर जिल्हाधि कारी यादव यांनी लोकप्रतिनिधी च्या भावना शासनाकडे पोहचविण्यासाठी प्रयत्न करून मार्ग काढू असे आश्वासन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या मागण्याचे सविस्तरपणे निवेदन देखील सादर केले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *