शेतकरीविरोधी जुलमी कायदे रद्द करा; अन्यथा रस्त्यावर उतरु !

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

भाजपाच्या मोदी सरकारने दडपशाहीने शेतकरी आणि कामगार विरोधी जूलमी कायदे मंजुर करुन घेतले. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उध्दस्त होणार असल्याने प्रचंड असंतोष आहे.

शेतकरी व कामगार विरोधी कायदे रद्द केले नाही, तर आम्ही रस्त्यावर रस्त्यावर उतरु, असा इशारा आ.कुणाल पाटील यांनी आजच्या शेतकरी बचाव आंदोलनात केला.

धुळे व तालुका काँग्रेसच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

दडपशाहीचे राजकारण करुन भाजपा देशात विघातक संस्कृत आणत असल्याची संतप्त प्रतिक्रीया श्री.देशमुख यांनी व्यक्त केली.

शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणि कामगार विरोधी विधेयकाच्या विरोधात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा.सोनिया गांधी, खा.राहूल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात, माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या आदेशान्वये आंदोलन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष युवराज करनकाळ, गुलाबराव कोतेकर, डॉ.दरबारसिंग गिरासे, भगवान गर्दे, पंढरीनाथ पाटील, साबीर शेठ, रमेश श्रीखंडे, किर्तीमंत कौठळकर, भिका पाटील, माधवराव पाटील, मुझ्झफर हुसैन, वानुबाई शिरसाठ, रावसाहेब पाटील, मुकूंद कोळवले, राजीव पाटील, अलोक रघुवंशी, दिपक पाटील, सुमन मराठे, सुरेखा पाटील, राजेंद्र खैरनार, जगदिश चव्हाण, गणेश गर्दे, शकील अहमद, प्रदिप देसले, अशोक सुडके, आबा गर्दे, सोमनाथ पाटील, हर्षल साळुंके, ज्ञानेश्वर मराठे, अरुण पाटील, डॉ.विजय देवरे, साहेबराव पाटील, सागर गिरासे, भिवसन अहिरे, पंकज चव्हाण, वसिम बारी, बापू खैरनार, गोकुळ सुर्यवंशी, प्रल्हाद मराठे, सतिष रवंदळे, किरण नगराळे, हरीष पाटील, जितेंद्र पवार, डॉ.विजय पाटील, संतोष पाटील, भिवसन अहिरे, गणेश खंडेकर, प्रविण माळी, शिवाजी अहिरे, योगेश मासुळे, हसण पठाण, हिमंत बाचकर, संदिप पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनाच्या आधी महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.

आज सकाळी 10 वा. धुळे तहसिल कार्यालयाजवळ शेतकरी व कामगार बचाव दिवस पाळून आंदोलन करण्यात आले. तसेच राजे संभाजी उद्यानातील लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.

श्री.देशमुख म्हणाले, भाजपाच्या राज्यात खा.राहूल गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना धक्काबुक्की केली जाते म्हणजे ही एक भाजपाची विघातक संस्कृतीच आहे. असा प्रकार आम्ही काँग्रेस शासीत प्रदेशातही करु शकतो परंतु ही काँग्रेसची अशी संस्कृती नाही.

केंद्रातील भाजपा सरकारने शेतकरी विरोधी विधेयक आणून शेतकर्‍यांना उध्वस्त करण्याचे काम केले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *