Friday, April 26, 2024
Homeराजकीयभाजपचे कार्यकर्ते कारवाईची मागणी करणार

भाजपचे कार्यकर्ते कारवाईची मागणी करणार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

माजी आ. अनिल गोटें हे गेल्या वर्षभरापासून दररोज पोलिसांची इभ्रत काढत आहेत. पोलिसांना कुणाच्या तुकड्यावर चालतात, अशा हीन दर्जाची भाषा वापरत असूनही जिल्हा पोलिस प्रशासन गप्प का ? असा सवाल भाजपने केला आहे.

- Advertisement -

गोटे हे हजार कार्यकर्ते घेवून दोंडाईचा पोलिस ठाण्यात जाणार असतील तर आम्ही दोन हजार कार्यकर्ते घेवून त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहोत असेही पत्रकात म्हटले आहे.

जिल्हा भाजपा, धुळे महानगर भाजपा आणि दोंडाईचा शहर भाजपाने आज संयुक्तरित्या पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांना निवेदन दिले.

यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, अनुप अग्रवाल, सुनील बैसाने, भिकन वराडे, प्रवीण महाजन, कृष्णा नगराळे, राजूबाबा धनगर, किशन दोधेजा, पंकज चौधरी, जितेंद्र गिरासे, गिरधारी रूपंचदानी, भरतरी ठाकूर, खलील बागवान, सुभाष धनगर, नरेंद्र बाविस्कर आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, 4 ते 5 दिवसापूर्वी माजी आ. अनिल गोटे यांनी माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांच्या फॉर्महाऊस जावून धिंगाणा घातला.

तेथील मॅनेजर प्रताप गिरासे यांच्याशी गैरवर्तण केले. त्यामुळे गिरासे यांनी दोंडाईचा पोलिसामध्ये कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे.

पंरतू अद्याप गोटेंवर कारवाई तर झालीच नाही उलट वर्तमानपत्राच्या माध्यमातून बेछुट भाषा वापरून पोलिसांची अब्रु वेशीवर टांगली जात आहे, तरी देखील पोलिस काहीही कारवाई करतांना दिसून येत नाहीत हे दुर्दैवच आहे.

…तर जबाबदारी पोलिसांचीच

उद्या दि. 18 डिसेंबर रोजी त्यांनी केलेल्या गुन्हयावर आरोपी म्हणून हजर होण्यासाठी पोलिसांनाच अल्टिमेटम देत गोटे हे मिरवणुकीने 1000 कार्यकर्त्यांसह पोलिस स्टेशनला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबाबतीत देखील पोलिस अदयाप गंभीर दिसत नाहीत म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे 2000 कार्यकर्ते गोटेंवर कारवाई करावी म्हणून मागणी करणार आहोत. याठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पुर्णत: पोलिस विभागच जबाबदार राहील असा इशारा त्यांनी पत्रकातून दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या