धनंजय मुंडेंनी बायका लपवल्या; करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप

६ मुलेही लपवल्याचा दावा
धनंजय मुंडेंनी बायका लपवल्या; करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप

कोल्हापूर | Kolhapur

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या, असा गंभीर आरोप करुणा मुंडे-शर्मा (Karuna Sharma Munde) यांनी केला. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North Assembly by-election) आपण उतरणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. अर्ज भरण्यासाठी शहरात आलेल्या करूणा यांनी अनेक गंभीर आरोप केले.

धनंजय मुंडेंनी बायका लपवल्या; करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप
Salman Khan : अभिनेता सलमान खानला अंधेरी न्यायालयाचे समन्स... काय आहे प्रकरण?

करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष (Shivshakti Sena Party) स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील (Kolhapur) करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करुणा मुंडे पोहोचल्या होत्या. जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असून महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणावर काम करणार आहे. कोल्हापुरातील घराणेशाहीचं राजकारण आपण संपवणार आहोत. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे. देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

धनंजय मुंडेंनी बायका लपवल्या; करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप
IPL 2022 : महेंद्रसिंह धोनीनं CSK चं कर्णधारपद सोडलं, ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्व

करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे असल्याचं करुणा यांनी यावेळी सांगितलं. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. धनंजय मुंडेंना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे कायदेशीर पुरावे आहेत त्यामुळे अर्ज करण्यासाठी मला कोणतीही अडचण येणार नाही, असे त्या म्हणाल्या.

धनंजय मुंडेंनी बायका लपवल्या; करुणा शर्मा यांचा गंभीर आरोप
Amruta Khanvilkar : 'अप्सरा हो तुम, या कोई परी'! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com