
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातील नेते आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे ( Dhananjay Munde )यांना गुरुवारी १६ दिवसांच्या उपचारानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांना पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
३ जानेवारीला मध्यरात्री धनंजय मुंडे यांच्या मोटारीला परळी येथे अपघात झाला होता. छातीला जखमा असल्याने त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन मुंडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
दरम्यान पुढील काही दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने मुंबईतील निवासस्थानी काही दिवस विश्रांती घेऊन परळी येथे लवकरच सर्वांना भेटून पुन्हा जनसेवेत दाखल होणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.