
मुंबई | Mumbai
शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या मुद्द्यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमने-सामने आले आहेत.
चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीवरून देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं. आव्हान देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ते विरोधी पक्षनेते असतानाच ऑडिओ ऐकवत निशाणा साधला होता. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी 15 सेकंदाचा व्हिडीओ ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ आणि महावितरणचं वीजबिल वसुलीबाबतचं पत्र ट्विटरवर शेअर केलं. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं की, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही. 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय आहे.
जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे.शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असं देंवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मध्य प्रदेश सरकारने 6500 कोटी रूपये स्वत: देऊन शेतकऱ्यांची वीजबील माफ केली आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये रोज सावकारी पद्धतीने वीजबील वसूल केली जात आहेत, असं फडणवीस ऑडिओ क्लिपमध्ये बोलत आहेत. यावर, काय बोलत होते त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाहीतर मनाची बाळगा. या ठिकाणी आम्हाला आनंद होत आहे की मध्य प्रदेशने शेतकऱ्यांचे वीज बील भरले आहेत. म्हणून आम्ही या ठिकाणा आम्ही फटाके फोडत आहोत ज्याचा आवाज त्या ठिकाणी जाईल.