काँग्रेसकडून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा घणाघात

काँग्रेसकडून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा घणाघात

मुंबई | Mumbai

आज कोर्टाच्या (Court) आदेशानुसार ईडीने (ED) काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना चौकशीसाठी बोलावले. पण यावेळी काँग्रेसने प्रमुख शहरांमध्ये आंदोलने (Agitation) करून नागरिकांना वेठीस धरण्याचे काम केले...

भ्रष्टाचाराबाबत (Corruption) पुरावे मिळाल्यानंतरच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. काँग्रेसकडून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.

काँग्रेसकडून व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा घणाघात
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २१ जूनला नाशकात; 'हे' आहे कारण

आज मुंबई (Mumbai) येथे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मी राहुल गांधी (Rahul Gandhi) आहे, सावरकर नाही, माफी मागणार नाही, असे पोस्टर्स दिल्लीत लावण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryavir Savarkar) यांनी ११ वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. त्यांना अपमानित करून स्वातंत्र्यसेनानींची संपत्ती हडप केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे..

ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिकांनी तयार केलेल्या एजीएलमध्ये २ हजार कोटींचा भ्रष्ट्राचार झाला. एजीएल कंपनी १९३८ साली तयार झाली होती. ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ही खासगी संपत्ती नाही. २०१० मध्ये गांधी कुटुंबाने यंग इंडियाची स्थापना केली. एजीएलची संपत्ती यंग इंडियामध्ये ट्रान्सफर केली, असा आरोप त्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com