तुमचा खरा चेहरा जनतेसमोर आणणारच; फडणवीसांचा इशारा

महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणणार
तुमचा खरा चेहरा जनतेसमोर आणणारच; फडणवीसांचा इशारा

नागपूर | Nagpur

भाजपला (BJP) गोवा निवडणुकीत (Goa Election) यश मिळवून देणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नागपूरमध्ये (Nagpur) जोरदार स्वागत करण्यात आले....

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशात पंतप्रधान मोदींचे (PM Narendra Modi) नेतृत्व अडचणी दूर करू शकते ही सर्वसामान्यांची भावना आहे. निवडणुका (Election) आल्या तेव्हा काही जण म्हणाले आता भाजपची (BJP) चलती आहे. मतदानानंतर यांच्या हातून उत्तरप्रदेश, गोवा उत्तराखंड गेले. आता त्यांची अवस्था ही मुंगेरीलाल के हसीन सपने सारखीच झाली आहे.

महाराष्टातदेखील (Maharashtra) आता परिवर्तनाची लाट सुरु झाली आहे. सरकारच्या (Government) भ्रष्टाचारविरोधी लढ्यात आता जनताही भाजपसोबत (BJP) उतरली आहे. आम्ही सरकारचा भ्रष्ट्राचारी बुरखा फाडत आहोत. हे सरकार महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार नाही तर महावसुली सरकार आहे.

या सरकारमधील दोन मंत्री जेलमध्ये आहे. भ्रष्ट्राचारविरोधातील लढाई आता एका शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे भाजप नेत्यांविरोधात खोट्या केसेस टाकणे सुरु आहे.

प्रवीण दरेकरांना (Pravin Darekar) फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कितीही खोट्या केसेस टाकल्या तरी भ्रष्ट्राचार बाहेर काढणे थांबणार नाही. तुमचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच राज्यात एक हाती सत्ता आणणारच, असा विश्वासदेखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com