देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; तर्क-वितर्कांना उधाण!

देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला; तर्क-वितर्कांना उधाण!

मुंबई l Mumbai

राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

राज ठाकरे यांच्या नव्याने बांधण्यात आलेल्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही कौटुंबीक भेट असल्याचं सांगितलं जात आहे. पण ही कौटुंबीक भेट असली तरी या भेटीत राजकीय गप्पा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच आगामी महापालिका निवडणुका किंवा विधानसभा निवडणुकांसाठी मनसे आणि भाजपा यांच्यामध्ये युती होणार का? याची तुफान चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. ही चर्चा दोन्ही पक्षांकडून जशी पूर्णपणे स्वीकारण्यात आलेली नाही, तशीच ती पूर्णपणे नाकारण्यात देखील आलेली नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com