मोदींच्या मंत्रिमंडळात फडणवीसांना स्थान?

नवी दिल्ली / New Delhi – केंद्र सरकारला आता मंत्रिमंडळ विस्ताराचे (Cabinet Expansion) वेध लागले आहेत. सध्या देशातील करोना परिस्थिती सुधारत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

मोदी सरकारच्या या मंत्रीमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याच्या नावाची सध्या चर्चा सध्या दिल्लीत सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनाही केंद्रातील मंत्रीमंडळात स्थान दिले जाऊ शकते. महाराष्ट्रातील या दोन नेत्यांची वर्णी केंद्रात लागू शकते. फडणवीस यांच्याकडे रेल्वे किंवा ऊर्जा मंत्रालयाचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 29 जूनला दिल्ली दौरा केला होता. त्यात त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांना केंद्रात बोलवण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर मागील काही दिवसांपासून ते केंद्रातील कामाचं देखील कौतूक करताना दिसत आहेत.

दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ओडिशामधून बैजयंत पांडा यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे. यूपीतून तीन-चार नेत्यांना स्थान दिलं जाणार आहे. तर भाजपच्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल बलूनी यांनाही मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *