Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याVIDEO : शिवसेनेने जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलंय; फडणवीसांची खोचक टीका

VIDEO : शिवसेनेने जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलंय; फडणवीसांची खोचक टीका

मुंबई | Mumbai

महाविकास आघाडी सरकार (MVA Govt) असदुद्दिन ओवैसींच्या (Asaduddin Owaisi) एमआयएम (MIM) पक्षासोबत हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर दिल्याचं म्हटलं. आता यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला (Shivsena) खोचक टोला लगावला आहे.

- Advertisement -

फडणवीस म्हणाले की, ‘MIM ने महाविकास आघाडीसोबत जरूर जावं. ते सगळे एकच आहेत. भाजपाला हरवण्यासाठी सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कुणीही सोबत आलं तरीही महाराष्ट्रातील जनता, देशातील जनता मोदींच्या (Modi) मागे आहे. ती भाजपालाच (BJP) निवडून देईल’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच ‘MIM सोबतच्या आघाडीबाबत शिवसेना काय करते याकडे आमचं लक्ष असेल. निवडणुकीत पराभव झाल्यावर विरोधकांना ईव्हीएममध्ये गोंधळ दिसतो. बी टीम दिसते, सी टीम दिसते. त्यामुळे हरल्यावर अनेक गोष्टी बोलत असतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शिवसेनेनं (shivsena) याआधी एमआयएमवर टीका केली आहे. ते सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत. शिवसेनेनं आता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे. आणि अजानचीही स्पर्धा सुरू आहे. त्याचाच हा परिणाम असावा’ असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला आहे.

आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे..

तसेच ‘भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) देखील शिवसेनेवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “वाह..एमआयएमचीही महाविकास आघाडीमध्ये येण्याची तयारी. कट्टरपंथींना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे. खरंच करून दाखवलं”, असं ट्वीट नितेश राणे यांनी केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या