महाराष्ट्रात सध्या 'लोकशाही' नसून 'लॉकशाही'

लॉकडाउनवरुन फडणवीसांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका
महाराष्ट्रात सध्या 'लोकशाही' नसून 'लॉकशाही'

मंगळवेढा | Mangalvedha

भारतासह राज्यात करोनाचा प्रसार गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वेगानं वाढत आहे. करोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता विकेंड लॉकडाउन जाहीर केला असून राज्यातील वाढता करोनाचा कहर पाहता पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. करोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मंगळवेढा येथे फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस बोलतांना म्हणाले की, "एका मतदारसंघाची ही पोटनिवडणूक असली तरी सरकारचा नाकर्तेपणा दाखवून देण्याची ही संधी मतदारांना मिळाली आहे. तसेच सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रात आहे. परंतु, ही परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच लॉकडाऊन केला जात आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांना आर्थिक पॅकेज न देता लॉकडाऊन केला जात आहे. पॅकेजशिवाय करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच राज्यात लोकशाही नसून लॉकशाही आहे," असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला आहे.

तसेच, "कधी लॉक करायचं…कधी अनलॉक करायचं…ठीक आहे तेदेखील आवश्यक असतं. परंतू जेव्हा आपण जेव्हा अशाप्रकारे लॉकडाउन करतो, लोकांचा रोजगार जातो तेव्हा किमान त्या लोकांना दिलासा म्हणून आपल्या तिजोरीतून २ रुपये दिले पाहिजेत. याचं मात्र सरकारला कुठेही भान दिसत नाही," अशी टीकाही त्यांनी केली यावेळी केली.

तसेच, "करोना रोखण्याचा उपाय म्हणून कधी लॉक, कधी अनलॉक असा खेळ सुरू आहे. लॉकडाऊनसारख्या गोष्टी गरजेच्या असतात. पण ते करताना ज्यांचा रोजगार जातो, त्यांना किमान दिलासा म्हणून सरकारी तिजोरीतून दोन रुपये दिले पाहिजेत याचं भानही या सरकारला नाही. कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड या शेजारच्या राज्यांत तिथल्या सरकारांनी करोना काळात सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना मदत केली. वीज बिलं माफ केली. सवलती दिल्या. मुळात सरकार असतं कसासाठी? अडचणीत मदत करण्यासाठी. मात्र, राज्यातलं ठाकरे सरकार हे सावकारांपेक्षाही भयंकर आहे," अशी खोचक टीका फडणवीसांनी केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com