Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयखडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत फडणवीस म्हणाले...

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत फडणवीस म्हणाले…

उस्मानाबाद

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे. सोमवारीच खडसे समर्थक नगरसेवकांनी जळगाव महानगरपालिका ‌‌‌बरखास्त करण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

आता खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवार बोलले, म्हणाले…

भाजपमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच खडसेंचे टीकेचे लक्ष राहिले आहे. नुकताच जामनेर येथील फडणवीस यांच्या कार्यक्रमातही खडसे गेले नव्हते. यामुळे एकनाथ खडसे २२ ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. कालच ‌उस्मानाबादमध्ये शरद पवार यांनी यासंदर्भात सुचक वक्तव्य केले.

मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. यावेळी पत्रकारांनी एकनाथ खडसे हे २२ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे का, असे विचारले असता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात. मी त्यावर बोलणार नाही’

याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शक्यता नाकारली होती. एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे, हे त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे’ असे फडणवीस म्हणाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या