Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा दावा

महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा दावा

मुंबई | Mumbai

अकोल्यातील जुने शहर येथे एका सोशल मीडिया पोस्टवरुन उसळलेल्या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला आहे. तसंच 10 पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच अहमदनगरच्या शेवगाव शहरात रात्री दोन गटात वाद निर्माण होऊन दगडफेक झाली. दरम्यान महाराष्ट्रात कायदा -सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहे.

- Advertisement -

दरम्यान अकोला आणि शेवगाव या दोन घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना मोठं वक्तव्य केलं आहे.महाराष्ट्रात जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कोणालाही दंगली घडवू देणार नाही. दंगेखोरांना अद्दल घडवू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अकोला आणि शेगाव या दोन्ही ठिकाणी पूर्णतः शांतता आहे. सगळीकडे चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन्ही ठिकाणी पूर्णतः शांतता आहे. पोलिस पूर्ण अलर्ट मोडवर होते. जसे लक्षात आले की, अशा प्रकारे काही लोक करण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळीकडची पोलिस कुमक त्या ठिकाणी पोहचली. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. महाराष्ट्रामध्ये कोणालाही दंगली घडवू देणार नसल्याचे ते म्हणाले. जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना अद्दल घडवू, अशा इशारा त्यांनी दिला.

VIDEO : शेवगाव येथे संभाजी महाराज मिरवणुकीत दगडफेक, ४ पोलीस जखमी

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दंगली घडवण्याचे प्रयत्न शंभर टक्के जाणूनबुजून होत आहेत. कोणाची तरी फूस आहे. कोणीतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातली कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते सफल होणार नाहीत. आणि अशाप्रकारे जे करत आहेत, त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. काही लोक आग लावण्याचा, आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे बाहेर आणणार असल्याचे ते म्हणाले.

Akola Violence : अकोल्यात दोन गटात तुफान राडा, दगडफेक अन् जाळपोळ… एकाचा मृत्यू, कलम १४४ लागू

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आमदार अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाकडून देण्यात येणाऱ्या निवेदनावरही भाष्य केलं. ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांना ७९ पानांचे निवेदन देण्यात आलं असून, सुप्रीम कोर्ट निर्णयाचे सर्व तपशील या निवेदनात नमूद केले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्ट निर्णयाच्या चौकटीत राहून निर्णय देण्याचे निवेदनात नमूद आहे.

जे काही सुरु आहे हे कोणत्या लोकशाहीत बसणारं आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांना घेराव घालू, चालू देणार नाही, फिरु देणार नाही असं बोललं जात आहे. अशा दबावातून विधानसभा अध्यक्ष कधीच निर्णय घेत नाहीत. तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा. तुमची बाजू कमकुवत आहे म्हणून अशी भाषा वापरणं सुरु आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Cyclone Mocha : ‘मोचा’चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर, NDRF अलर्ट मोडवर

विधानसभा अध्यक्ष निष्णांत वकील असून, कायदा समजणारे आहेत. वर्षानुवर्षे त्यांनी प्रॅक्टिस केली असून ते कोणतंही बेकायदेशीर काम करणार नाहीत. कोर्टाने जास्त वेळ वाया न घालवता निर्णय घ्या सांगितलं आहे, त्याचा अर्थ त्यांना कळतो. ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील. कोणी कितीही दबाव आणला तरी ते त्याला बळी पडणार नाहीत, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या