Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याहे तर लबाडच निघाले; देवेंद्र फडणवीसांचा मविआला टोला

हे तर लबाडच निघाले; देवेंद्र फडणवीसांचा मविआला टोला

चंद्रपूर | Chandrapur

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केले जात आहे…

- Advertisement -

सरकारच्या कार्यपद्धतीपासून ते खातेवाटपापर्यंत अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत चिमूरमध्ये शहीद स्मृतिदिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहतानाच विरोधकांवर टीका केली.

ते म्हणाले की, गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अडीच वर्ष ज्यांनी काहीही केले नाही, ते आज आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. माझं त्यांना एवढेच सांगणे आहे की ५ वर्षं आमचे सरकार होते. सरकार कसे चालते, हे आम्ही दाखवून दिले.

आजही लोक लक्षात ठेवतात की २०१४ ते २०१९ मध्ये जनतेचे सरकार होते. आता पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लोकाभिमुख सरकार आम्ही आणू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत मोठा गौप्यस्फोट; ऑडीओ क्लिप व्हायरल

गेल्या अडीच वर्षांत ७०० रुपये बोनस देतो असे सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही. आपण त्याच वेळी सांगितले होते की लबाडाचे आवतण जेवल्याशिवाय खरे नाही. हे लबाडच निघाले, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) लगावला. तसेच आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत मी बोनस देण्यासंदर्भात चर्चा करेन. आपले सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या