देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावे; भाजपच्या केंद्रीय कमिटीचे निर्देश

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावे; भाजपच्या केंद्रीय कमिटीचे निर्देश

मुंबई | Mumbai

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (Chief Minister) असतील, अशी घोषणा केली आहे. तसेच आपण या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून सरकारला (Government) पाठिंबा देऊ...

मंत्रिमंडळात शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे (BJP) आमदार असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र त्यानंतर आता भाजपच्या केंद्रीय कमिटीने फडणवीस यांना एक आग्रह केला आहे.

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावे; भाजपच्या केंद्रीय कमिटीचे निर्देश
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेण्याचे आदेश दिले आहेत. आता भाजपच्या केंद्रीय कमिटीच्या निर्देशानंतर फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार, अशी माहिती मिळत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com