देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
राजकीय

पोलीस अनेकदा राजकीय दडपणाखाली काम करतात

देवेंद्र फडणवीस यांंचे मत

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई |Mumbai -

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान चर्चेचा विषय ठरलं आहे. अनेक वेळा पोलीस राजकीय दडपणाखाली काम करतात. तसं त्यांनी करू नये, अशी आमची अपेक्षा आहे, असं त्यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis says Police often work under political pressure

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर भाजपची भूमिका मांडताना दोन्ही तारांवर पाय ठेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. एकीकडे त्यांनी पोलिसांवर विश्वास देखील व्यक्त केला आहे. मात्र, दुसरीकडे त्यांनी पोलिसांवर राजकीय दडपण असल्याचे देखील संकेत दिले आहेत. मया प्रकरणात ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली, त्यातून जनभावना तयार झाली की याची सीबीआय चौकशी व्हायला हवी. म्हणूनच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण मी महाराष्ट्र पोलिसांसोबत 5 वर्ष काम केलं आहे. त्यांची क्षमता मला पूर्णपणे माहिती आहे. महाराष्ट्राचे पोलीस उत्तम काम करतायत, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांच्या सगळ्याच गोष्टी खर्‍या नसतात

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. पवार कुटुंबीयांमध्ये सध्या सुरू असलेला वाद हा त्यांच्या अंतर्गत कौटुंबिक प्रश्न आहे. त्यात आम्हाला पडायचं नाही. त्याच्याशी आमचा संबंध नाही. तो प्रश्न त्यांनीच सोडवायचा आहेफ, असं सांगतानाच संजय राऊतांनी याविषयी केलेल्या वक्तव्यांवर फडणवीस म्हणाले, संजय राऊत तशा अनेक गोष्टी बोलत असतात. पण ते बोलत असलेल्या सगळ्याच गोष्टी खर्‍या थोडी असतात!

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com