देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस|राजकीय
राजकीय

सरकार पाडणार नाही, अंर्तविरोधाने पडेल

देवेंद्र फडणवीस यांचा राज्यसरकारवर निशाणा

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

मुंबई | Mumbai -

महाविकास आघाडी सरकारमधील Maha Vikas Aghadi Government वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे दुभंगलेलं कुटुंब आहे. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीने आयोजित केेलेल्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजनही स्पष्ट केलं.

ते म्हणाले, ठाकरे सरकार पाडण्यासाठी आम्ही कुठलेही प्रयत्न करणार नाही. आम्हाला त्यात अजिबात रस नाही. सध्या महामारीचा काळा आहे, महामारीची लढाई सुरु आहे. आम्ही आमच्यापरीने, क्षमतेने करोना संकटाशी लढतोय. पण माझं एक ठाम मत आहे. देशाच्या पाठीवर अशा प्रकारचं सरकार कधीच चाललं नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेसनेही याप्रकारचं सरकार कधीही चालू दिलं नाही. त्यामुळे देशाचा राजकीय इतिहास हा महाराष्ट्रात बदलेलं, असं दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारमधील वादविवाद खूप टोकाला गेले आहेत. हे कुटुंब आहे ते दुभंगलेलं आहे. याला कुटुंब म्हणूच शकत नाही. हे सरकार म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप आहे. अंर्तविरोधामुळेच हे सरकार पडेल आणि ज्या दिवशी हे सरकार पडेल त्यादिवशी आमच्यावर जबाबदारी येईल आणि आम्ही एक मजबूत सरकार महाराष्ट्राला देऊ.

Deshdoot
www.deshdoot.com