शिवसेनेसोबत युती करण्यास तयार होतो, मात्र त्यांनी...; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

शिवसेनेसोबत युती करण्यास तयार होतो, मात्र त्यांनी...; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबई | Mumbai

आम्ही शिवसेनेसोबत (Shivsena) युती करण्यास तयार होतो मात्र केवळ चार जागांकरता शिवसेनेकडून युती तोडण्यात आली. युती तोडल्यानंतर 118 जागांवर लढणारा भाजप एका दिवसात 288 जागा लढायला तयार झाला....

याचे एकमेक कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे आमच्या पाठीमागे उभे होते. दोन महिने अमित शाह महाराष्ट्रात येऊन राहिले होते. निवडणुकीचे तंत्र अमित शाह यांनीच शिकवले, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

शिवसेनेसोबत युती करण्यास तयार होतो, मात्र त्यांनी...; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
तिकीट बुकिंगबाबत रेल्वे मंत्रालयानं घेतला मोठा निर्णय

अमित शाह (Amit Shah) यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे वारंवार भाजपवर (BJP) हल्ला चढवत आहेत. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेसोबत युती करण्यास तयार होतो, मात्र त्यांनी...; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

आपल्यासोबत शिवसेनेने जी बेईमानी केली होती त्याला छेद देत आणि बेईमानांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात एकत्र आली. या काळात आमच्या पाठीशी भक्कमपणे अमित शाह उभे होते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com