Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याखडसे पुन्हा भाजपमध्ये येणार का?, देवेंद्र फडणवीसांचं चार शब्दांत उत्तर, म्हणाले...

खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार का?, देवेंद्र फडणवीसांचं चार शब्दांत उत्तर, म्हणाले…

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे.

- Advertisement -

मात्र, यातच आता भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या घरवापसीच्या चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ खडसेंनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावरून खडसेंच्या ‘भाजपावापसी’वर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या चर्चांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद आणि मतभेद जगजाहीर आहेत. खडसे पुन्हा भाजपमध्ये येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी फडणवीसांना विचारल्यानंतर त्यांनी ‘मला याबाबत काही कल्पना नाही’, असं म्हणत बोलणं आटोपतं घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं आता खडसेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना आणखी उधान आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या