“नक्की विचार करू, पण...”; राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीस स्पष्टच बोलले

“नक्की विचार करू, पण...”; राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीस स्पष्टच बोलले

मुंबई | Mumbai

अंधेरी पूर्व विधानसभा निवडमुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडमोडींना वेग आला आहे. या निवणुकीत उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला सुरुवात झाली आहे.

या पोटनिवडणुकीमध्ये मनसेची भूमिका काय असेल असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. असे असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात भाजपाला आवाहन केले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून भाजपाने ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी आवाहन करणारं पत्र लिहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, 'अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेनं आम्हाला पाठिंबा द्यावा, यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन आले. त्यावेळी अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी आम्हीही उमेदवार न देण्याची विनंती आशिष शेलारांकडे केली. त्यानंतर आता मला पत्र देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली आहे.'

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, 'भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकटा निर्णय करू शकत नाही. राज ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल, तर मला माझ्या सहकाऱ्यांशी आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागेल. आम्ही उमेदवार घोषितही केलाय आणि उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. यापूर्वी अशा काही पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली तर त्यावेळी आम्ही माघार घेण्याची भूमिका घेतली होती. पण या स्टेजला आता त्या संदर्भात काही भूमिका घ्यायची असेल तर मला घेता येत नाही. पक्षात या संदर्भात चर्चा करावी लागेल. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. जरूर आम्ही या पत्राचा गांभीर्यानं विचार करू, मात्र जो निर्णय घ्यायचा आहे, तो चर्चे अंति घेता येईल.'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com