Friday, April 26, 2024
Homeराजकीय'मी राजकारणात आहे, मी उत्तराला उत्तर देईन'

‘मी राजकारणात आहे, मी उत्तराला उत्तर देईन’

मुंबई | Mumbai

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं ‘तिला जगू द्या’ हे गाणं भाऊबीजेच्या निमित्ताने रसिकांच्या भेटीस आले होते.

- Advertisement -

या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं होत. हे गाणं पाहून काही नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करत अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या गाण्यावर काही कलाकार व काही राजकीय लोकांनी देखील टीका केली. या सर्वांवर देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे की, “घरच्यांच्या संदर्भात जो काही विषय मांडला जातोय, त्याबद्दल बोलायचं झाल्यास आम्ही कोणाच्याही घरच्यांवर हल्ला करत नाही. आम्ही कधीच घरच्यांवर टीका केली नाही. आम्ही संयम बाळगतो. घरच्यांवरील टीकेबाबत बोलायचं झालं कर याचं सर्वात मोठं उदाहरण मी स्वतः आहे. माझ्या पत्नीच्या संदर्भात शिवसेनेचे अधिकृत नेते काय लिहतात, काय बोलतात हे सगळ्यांनाच माहितीये. पण मी त्याचा कांगावा करत नाही. मी राजकारणात आहे. मी उत्तराला उत्तर देईन, असा पलटवार त्यांनी केला आहे.

अमृता फडणवीसांच्या गाण्यावरून मराठी कलाकारांमध्ये ‘फेसबुक वॉर’

दरम्यान, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या माध्यमातून अभिनंदन मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी, ‘जर आमच्या किंवा आमच्या कुटुंबीयांच्या वाट्याला कोणी गेलं तर त्यांनाही कुटुंब आहेत’, असं वक्तव्य केलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या