Saturday, April 27, 2024
Homeराजकीयओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू

ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू

मुंबई | Mumbai

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळायलाच हवं. त्याबाबत दुमत नाही. पण ओबीसींच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही असं म्हणत ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरुन विरोध करु असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

- Advertisement -

तसेच ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं. भाजपाच्या ओबीसी कार्यकरिणीच्या बैठकीला संबोधित करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही याबद्दलचं कलम टाकलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं. मात्र ओबीसी आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावला तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार! भाजपा रस्त्यावर उतरून आंदोलन काढल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तसंच ते म्हणाले की मला दुसरं आश्चर्य हे वाटतं की सरकारमधले मंत्रीच मोर्चे काढत आहेत. सरकारमधल्या मंत्र्यांना सरकारविरोधात मोर्चे काढण्याचा अधिकार नाही. बाहेर मोर्चे काढून लोकांना भरकटवलं जातं आहे. त्यापेक्षा मंत्रिमंडळात ठराव आणा की ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असा ठराव तरी मान्य करा. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ओबीसींचा विकास होणार नाही, तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही. त्यामुळे ओबीसींची विकास झाला पाहिजे. येत्या काळात ३४६ ओबीसी घटकांचा मेळावा घेतला जाईल. येणारा काळ संघर्षाचा असल्याने ओबीसी मोर्चाची मोठी जबाबदारी असणार आहे, असं ते म्हणाले. भाजपमध्ये ओबीसींचं योगदान मोठं आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींचा पक्ष म्हटलं जायचं असं सांगतानाच ‘सबका साथ सबका विकास’ हेच भाजपचं ध्येय असल्याचंही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या