
मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी मुलाखत घेतली असून त्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसारित करण्यात आला. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली आहे.
त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे. मी फिक्स मॅच पाहत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी फिक्स मॅच पाहत नाही. मी लाईव्ह मॅच पाहतो. खरी मॅच बघतो. ही मुलाखत म्हणजे फिक्स मॅच आहे, ती पाहून त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची? काही दिवसांनी सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तेव्हा प्रतिक्रिया देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या कामांवर स्थगिती आणल्याचा आरोप अजित पवारांनी फडणवीसांवर केला. त्यासंदर्भात ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या कोणत्याही कामांवर स्थगिती नाही. या कामाला स्थगिती देता येणार नाही, असं त्या फाईलवर मी स्पष्ट लिहिलं आहे. एवढंच नव्हे तर यासंदर्भात काय काय कामं केली जाणार आहेत याचं सादरीकरण राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यांमंत्र्यांसमोर सादर करावं. त्यात काही कमतरता असतील तर करून घेतले जाईल, असं म्हटलं आहे.