देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले....

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले....

नागपूर | Nagpur

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. याशिवाय पंतप्रधान मोदींनी नागपुरातील मेट्रोच्या दुसऱ्या फेजचं भूमिपूजन करण्यात आलं असून यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

दरम्यान समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीवर निशाणा साधला. राज्यात सरकार बदलून डबल इंजिन सरकार आले नसते तर समृद्धी महामार्ग वेगाने पूर्ण झाला नसता, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम संथ गतीने सुरू होते. या महामार्गाबाबत केंद्र सरकारने काही शंका उपस्थित केल्या होत्या. त्याच्या परिपूर्ततेकडे लक्ष दिले गेले नाही. मात्र, सरकार बदलताच आ्ही याकडे लक्ष देत केंद्र सरकारला पुन्हा प्रस्ताव पाठवला. त्यानंतर केंद्र सरकारने अवघ्या 35 दिवसांत समृद्धी महामार्गाला मंजूर दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com