Maharashtra Bandh : फडणवीसांचा हल्लाबोल : कायदा चालवणारेच घेतात बंदचा निर्णय

Maharashtra Bandh : फडणवीसांचा हल्लाबोल : कायदा चालवणारेच घेतात बंदचा निर्णय
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Courtesy : Facebook/Devendra Fadnavis

मुंबई l Mumbai

महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi)पुकारलेला बंद (bandh)हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करतानाच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद (terrorism)आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. देशाचा इतिहासात कायदा चालवणारे बंद करण्याचा निर्णय घेण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
आर्यनचा कोठडीतील मुक्काम वाढला : वाचा, आज काय झाले कोर्टात

भाजपाने मात्र या बंदवर चांगलीच टीका केली आहे. अनेक भाजपा नेत्यांनी या बंदचा निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडा सरकारवर (MVA Govt) हल्लाबोल केला आहे. आजचा हा बंद केवळ ढोंगीपणाचा कळस असल्याचंही ते म्हणाले आहेत.

'बांधावर केलेल्या घोषणा हवेत विरल्या आहेत. आजचा महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) हा उत्तर प्रदेशातील घटनेला संवेदना दाखविण्यासाठी नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी संकुचित विचाराने केलेला बंद आहे. लोकांचा बंदला पाठींबा नाही. पोलिस प्रशासन आणि दमदाटी करून लोकांना बंद करायला प्रवृत्त केलंय जातयं. खऱ्या अर्थानं हे बंद सरकार आहे. धमक्या देऊन हा बंद केला जात आहे. एकूणच सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्यासारखा हा बंद आहे, असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तसेच या सरकारला एक नवं नाव देत देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'या सरकारचं नाव बंद सरकार असं आहे. आधी योजना बंद केल्या, त्यानंतर अनुदान बंद केलं. करोनाकाळात जेव्हा देश सुरू होता, तेव्हा राज्य बंद केलं आणि आता कुठे छोट्या व्यावसायिकांचं गाडं रुळावर येतंय तर आता पुन्हा सरकारने बंद पुकारला आहे. सरकार स्पॉन्सर दहशतवादाने हा बंद केला जात आहे. जर थोडी नैतिकता असेल तर बंद संपायच्या आधी राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार पॅकेज जाहीर करतील'.

दरम्यान, नुकत्याच राजस्थान मध्ये काँग्रेसकडून शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली गेली. यावर का हे मंडळी बोलत नाही असा सवाल ही अखेरीस फडवणीस यांनी उपस्थितीत केला आहे. तर शेतकऱ्यांना भाजपच्या विरोधात करुन हे सरकार आपली पोळी भाजू पाहत असल्याचे ही फडवणवीस यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.