VIDEO : मनसे-भाजप युतीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले,...

VIDEO : मनसे-भाजप युतीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले,...

मुंबई | Mumbai

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeay) यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासंदर्भीतील घेतलेली भूमिका, हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण यामुळं राज्याच्या राजकारणात ते चर्चेत आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हिंदुत्त्वाच्या भूमिकेमूळं भाजप (BJP) आणि मनसे (MNS) यांच्यात युती होईल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप मनसे युतीसंदर्भात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. (Bjp Mns Alliance news)

देवेंद्र फडणवीस यांनीभाजप मनसे युतीच्या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा झाली नाही, असा काही प्रस्ताव आलेला नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी आमच्या भूमिकेशी साम्य असलेली भूमिका घेतली आहे. हिंदुत्व, आणि लाऊडस्पीकर असो या भाजपच्या भूमिका राहिल्या आहेत. मात्र मनसे आणि भाजपच्या प्रतिक्रिया अपरिपक्व आहेत. अशी कोणतीही अधिकृत चर्चा झाली नाही. असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मनसे- भाजप युतीला पूर्णविराम लगावला आहे.

VIDEO : मनसे-भाजप युतीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले,...
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

दरम्यान इंधनदरवाढीवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारचा दृष्टीकोण अतिशय लघू आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या सरकारला उघडं पाडलं आहे. सरकारने १ लाख २० हजार रुपये इंधन दरावरील कर कमावला. दर कमी करण्याची वेळ आल्यानंतर वेगवेगळे बहाणे केले जात आहेत. देशातील भाजपशासित सर्व राज्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले आहेत. गुजरातमध्ये १५ रुपयांनी दर कमी आहेत, असा निशाणा फडणवीसांनी साधला आहे.

VIDEO : मनसे-भाजप युतीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले,...
'श्रुती हसन'चा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

Related Stories

No stories found.