आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; खासदार नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; खासदार नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील (Shivsena) ४० आमदारांसह बंड करत भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यानंतर भाजपच्या नेतेमंडळींकडून वारंवार फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला धरुन वक्तव्य करण्यात आली आहे.

आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; खासदार नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
बंधाऱ्यात आढळला तरुणाचा मृतदेह, दहा दिवसांतील दुसरी घटना... आत्महत्या की घातपात? गूढ कायम

यातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत असं विधान केलं आहे. खासदार नवनीत राणा यांनीही आमच्या मनात तुम्हीच मुख्यमंत्री आहात असं म्हटलं आहे. त्यामुळे नवनीत राणांचं हे वक्तव्य शिंदे मान्य होणार की त्यातून काही नाराजी व्यक्त होणार याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; खासदार नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
“आता धर्म आठवला का? हसन मियांचं काऊंटडाऊन...” ED छापेमारीनंतर सोमय्यांचा हल्लाबोल

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. अमरावतीसाठी पदवीधर मतदार संघातून डॉ. रणजीत पाटील यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या दसरा मैदानावर भाजप नेत्यांची सभा पार पडली. याच प्रचारसभेत बोलताना नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीची तोंडभरुन स्तुती केली.

'देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सगळ्यांना आपण उपमुख्यमंत्री वाटतात. पण, आमची कामे ज्या पद्धतीने आपण करता, त्यामुळे आमची मनातून इच्छा आहे की आमचे मुख्यमंत्री आपणच आहात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत यात माझ्या मनात शंका नाही, असे म्हणत आमदार नवनीत राणा यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच त्याचं कौतुक केलं. खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. राणा यांचा हा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच; खासदार नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
अचानक ट्रॅक्टरसमोर येऊन उभा राहिला बिबट्या अन्..., पुढं जे घडलं ते थक्क करणारं

दरम्यान शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर सातत्याने देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सुपर सीएम किंवा दुसरे मुख्यमंत्री असा केला जातो. अनेकदा आदित्य ठाकरेंनीही एकनाथ शिंदेंवर टीका करताना आपल्या राज्याला दोन मुख्यमंत्री आहेत एक मुख्यमंत्री आणि दुसरे स्पेशल मुख्यमंत्री असं म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com