Friday, April 26, 2024
Homeराजकीय...अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल

…अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल

मुंबई | Mumbai

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आज राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना त्यांनी या निवडणुकांवरून राज्य सरकारला थेट इशाराच दिला आहे.

- Advertisement -

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यावरून, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ओबीसी समाजाचा विश्वासघात राज्य सरकारकडून होत आहे, असे म्हणत भाजपाकडून तीव्र आंदोलनाचा इशाराच देण्यात आला आहे. एकतर राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले. मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्‍याच दिवशी निवडणुका जाहीर होतात, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. ओबीसी समाजाचा विश्वासघात बंद करा, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराच फडणवीस यांनी दिला आहे.

तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घोषित झाल्या आहे. यात एकही जागा ओबीसींकरता राखीव राहणार नाहीत. आम्ही राज्यपालांकडे या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आम्ही हा निर्णय केलाय की याबाबत आम्ही आंदोलन करणार आहोतच. पण सरकारचा डाव असेल की निवडणुका घ्यायच्याच. तर आम्ही या सर्व जागावर फक्त ओबीसी उमेदवार देऊ. मग जिंकलो किंवा हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. त्या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजूनच आम्ही त्या निवडणुका लढवू, अशी आक्रमक भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केलीय.

- Advertisment -

ताज्या बातम्या