Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासीमा वादावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही, तिकडचीच गावे…”

सीमा वादावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातलं एकही गाव जाणार नाही, तिकडचीच गावे…”

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद बसवराज बोम्मई यांच्या विधानानं चिघळण्याची शक्यता निर्माण झालीये. महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगण्याचा कर्नाटक सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचं विधान बोम्मईंनी केलंय. त्यामुळे महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटण्यास सुरूवात झालीये. बोम्मईंच्या या विधानानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्मई यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोललेत ते समजून घ्या. सीमा वादावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर महत्त्वाचे निर्णय घेतलेत. सीमा भागातील आपल्या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच आधीच्या योजनांसह नव्याने काही योजना आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य केलं असावं. महाराष्ट्रातलं एकही गाव कुठे जाणार नाही. मात्र आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह आमची गावे आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे असंही फडणवीस यांनी सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सीमाभागातील प्रश्नाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या राज्यपालांची कोल्हापूरमध्ये बैठक झाली होती. तसेच सीमाप्रश्नाबाबत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची समन्वय समितीही राज्य सरकारकडून तयार करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र सरकारकडून सीमाप्रश्नाबाबत सकारात्मक पावले उचलली जात असताना कर्नाटक सरकारने मात्र ४० गावांचा विषय उकरून काढत खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे. आता राज्य सरकार कर्नाटकला काय प्रत्युत्तर देते याची प्रतीक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या