फडणवीस दिल्लीला; मुख्यमंत्र्यांचे सगळे कार्यक्रम रद्द

फडणवीस दिल्लीला; मुख्यमंत्र्यांचे सगळे कार्यक्रम रद्द

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे आज दिवसभरातील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्याने सर्व प्रशासकीय कार्यक्रम आणि बैठका रद्द केल्या आहेत....

सततचे दौरे आणि पहाटेपर्यंत चालणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी अनेक दौरे केले असून विश्रांती घेतलेली नाही. त्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिली.

फडणवीस दिल्लीला; मुख्यमंत्र्यांचे सगळे कार्यक्रम रद्द
उद्धव ठाकरे गटाला 'सर्वोच्च' धक्का; 'ती' मागणी फेटाळली

याबाबत प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनीही माहिती दिली. मुख्यमंत्री यांची जागरणामुळे तब्येत नाजूक आहे. फार गंभीर काही नाही. थोडा आराम करून ते पुन्हा कामाला लागतील, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

फडणवीस दिल्लीला; मुख्यमंत्र्यांचे सगळे कार्यक्रम रद्द
सत्तासंघर्षाबाबत पुढील सुनावणी ८ ऑगस्टला; काय घडले आज कोर्टात?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांनीही आजचे सर्व कार्यक्रम तातडीने रद्द केले आहेत. फडणवीस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा दौरा मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com