ऐकून कंटाळा आला, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर...; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

ऐकून कंटाळा आला, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर...; फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुंबई | Mumbai

बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. दोन्ही नेत्यांनी केलेल्या भाषणांवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर खोचक शब्दांत टीका केली आहे....

फडणवीस म्हणाले की, बीकेसीच्या मैदानावर ज्या प्रमाणात लोक पाहायला मिळाले ते पाहता काल एकनाथ शिंदेंनी हे दाखवून दिले की खरी शिवसेना कोणती. त्या मैदानाची क्षमता शिवाजी पार्कपेक्षा दुप्पट आहे. पण तरीही तिथे तुडुंब गर्दी होती.

ऐकून कंटाळा आला, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर...; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
महापौरांसह १८ जणांचा अंदाधुंद गोळीबारात जागीच मृत्यू

राज्यातून लोक आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, हे कालच्या मेळाव्यात प्रस्थापित केले आहे. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो, असे फडणवीस म्हणाले.

ऐकून कंटाळा आला, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर...; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस; प्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या

शिमग्यावर कधीही प्रतिक्रिया देत नसतात, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणातील प्रत्येक मुद्द्यावर हे एकच उत्तर असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे भाजपाची स्क्रिप्ट घेऊन बोलतात, असा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.

ऐकून कंटाळा आला, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर...; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
मुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींचाही रेकॉर्ड मोडला

असे जे म्हणत आहेत, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर बदलायला हवा. तेच ते, तेच ते.. किती वेळा तीच स्क्रिप्ट. एकतर तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी दाखवायला सांगा, नाहीतर नवीन स्क्रिप्टरायटर आणा. आम्हालाही हे ऐकून कंटाळा आला आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com