मुख्यमंत्र्यांकडे 'टोमणे बॉम्ब' नावाचं शस्त्र; फडणवीसांचा खोचक टोला

मुख्यमंत्र्यांकडे 'टोमणे बॉम्ब' नावाचं शस्त्र; फडणवीसांचा खोचक टोला

मुंबई | Mumbai

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia-Ukraine) सुरू आहे. यासाठी युक्रेनच्या अध्यक्षांनी आमच्या मुख्यमंत्र्यांकडून सल्ला घ्यावा. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वात मोठे शस्त्र आहे, ते म्हणजे 'टोमणे बॉम्ब' शस्त्र, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे....

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री नवाब मलिकांचे (Nawab Malik) समर्थन कसे करू शकता?. मेहबुबा मुफ्तीसोबत तुम्ही गेला असे मुख्यमंत्री म्हणाले. अशा प्रकारच्या आरोपींना फाशी देऊ नये, असे म्हणणारे तुमच्यासोबत बसले होते.

मुफ्तींबाबत आयएसआयने सांगितले, की काश्मीरमध्ये (Kashmir) निवडणूक (Election) होऊ देणार नाही. त्यावेळी देशाची गरज होती, त्यामुळे आम्ही मुफ्तीसोबत सरकार बनवले. आम्ही जगाला दाखवून दिले की येथे निवडणूक होऊ शकते.

दुसऱ्याच क्षणी आम्ही लाथ मारली, तर तुमच्या घरगडी आहेत त्यांना ईडी (ED) बोलवत आहे. त्यामुळे ईडी म्हणजे घरगडी म्हणता का? मुंबई पोलीस (Mumbai Police) तुमचे घरगडी आहेत का? उद्या कोण परवा कोण तुरुंगात जाणार? हे कोणीच घोषित करू नये. पण, ही अक्कल संजय राऊतांना (Sanjay Raut) देणार आहात का? महाराष्ट्राची (Maharashtra) बदनामी करू नका, असे म्हणता. पण, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मराठी नाही हे लक्षात ठेवा, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, मोदींसोबत तुम्ही मते मागितली. मात्र सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागलात. कोण शीखंडी आहे? शीखंडीला पुढे करणारी ही औलाद नाहीये. समोर लढणारी लोक आहोत. कपटांनी राज्य कौरवांनी घेतले होते. पांडवांनी घेतले होते.

पण पांडव घाबरले नव्हते. आम्ही घाबरत नाही. आम्ही मांडलेल्या गोष्टी पुराव्यानिशी मांडल्या. त्याला उत्तरे मिळालीच नाही. विधानसभेत कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिले गेले नाही. भाषण विधानसभेतील होते, पण ते शिवाजी पार्कवरील झाझे, असाही टोला फडणवीसांनी लगावला. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

Related Stories

No stories found.