राज ठाकरे खरं बोलले की 'त्यांना' खाजवायला होतंय; फडणवीसांची टीका

राज ठाकरे खरं बोलले की 'त्यांना' खाजवायला होतंय; फडणवीसांची टीका

मुंबई | Mumbai

भारतीय जनता पक्ष (BJP) सक्षम आहे. आता आम्ही पोलखोल यात्रा (Polkhol Yatra) सुरु केल्यामुळे सरकार व्यतिथ झाले आहे. आमच्या पोलखोल यात्रेवर हल्ले होत आहे. कितीही हल्ले केले तरी आम्ही घाबरणार नाही. राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची (Corruption) दररोज पोलखोल करणार, असा इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे....

आज कै. मनीबाई मोरेश्वर पाटील बालोद्यानाचे लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

राज ठाकरे (Raj Thackeray) हे भाजपच्या हातचे बाहुले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे.

यावर विचारणा झाल्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, राज ठाकरे (Raj Thackeray) २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत होते. तेव्हा जयंत पाटलांना राज ठाकरेंचे बोल गुलुगुलू वाटत होते, गुदगुल्या होत होत्या.

मात्र आता राज ठाकरे हे सत्य बोलत आहे तर त्यांना खाजवायला होत आहे. राज ठाकरेंचा घाव वर्मी लागत आहे. भाजपला (BJP) कुणालाही समोर करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.