मुख्यमंत्र्यांच्या पत्राची भाषा अशोभनीय

फडणवीस यांची टीका: युवा सेनेवरही साधला निशाना
मुख्यमंत्र्यांच्या पत्राची भाषा अशोभनीय

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar'

महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपालांमधील संघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. त्या पत्रातील भाषा अशोभनीय असल्याचे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. तर राज्यपाल्यांनी दिलेले उत्तर संयमी असल्याची प्रतिक्रीया त्यांनी दिली.

फडणवीस हे एका खासगी कार्यक्रमानिमित्त नगर शहरात होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री प्रा. राम शिंदे उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, संविधानाचे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे. परंतु ठाकरे सरकारकडून तसे होताना दिसत नाही.

ठाकरे सरकार पळकुटे, भयभीत असल्याची टीका त्यांनी केेली. विद्यापीठाचा बाजार मांडला आहे. अलिकडच्या काळात असे लक्षात आले आहे की, विद्यापीठांच्या संपत्तीवर सरकारचा डोळा आहे. विद्यापीठ हे युवा सेनेचे अड्डे बनविण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com