Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा मोठा दिलासा! 'त्या'प्रकरणी दोषमुक्त

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा मोठा दिलासा! 'त्या'प्रकरणी दोषमुक्त

मुंबई | Mumbai

निवडणूक शपथपत्रात (Affidavit) दोन गुन्ह्यांची नोंद नसल्याचं प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोषमुक्त झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील दोन गुन्हे हे खाजगी स्वरुपाच्या होत्या. जे गुन्हे लपवले त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याने फडणवीसांना दोषमुक्त करण्यात आलं आहे.

या सुनावणीसाठी देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन पद्धतीने न्यायालयीन कामकाजात सहभागी झाले होते. वकील सतीश उके (Satish Uke) या प्रकरणात तक्रारदार त्यांनी याचिका दाखल केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. या प्रकरणाचा निकाल 5 सप्टेंबर रोजी सुनावला जाणार होता. परंतु न्यायालयाने निकालाची तारीख ही 8 सप्टेंबर निश्चित केली. अखेर नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केलं.

2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती लपवली असा आरोप अ‍ॅड. सतीश उके यांनी याचिकेतून केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी होती. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलांनी नजरचुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते असा दावा केला होता.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com