Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा; फडणवीस म्हणतात, राजकारणात कधीही...

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या चर्चा; फडणवीस म्हणतात, राजकारणात कधीही…

मुंबई (Mumbai)

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) एकाच व्यासपीठावर होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केलेल्या एका विधानानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी भविष्यात भाजपासोबतच्या (bjp) युतीबाबतचं सूचक विधान केल्याचं पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीच्या (Shiv Sena Bjp Alliance) चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही मनातील भावना बोलून दाखवली असेल’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच, ‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आजच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, हे त्यांना रिअलाईज झालं असेल, त्यामुळे त्यांना शुभेच्छा, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

देवेंद्र फडणवीसांनी या वेळी बोलतांना काँग्रेस (Congress-NCP) आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले की, ‘स्पष्टपणे समजतो काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका पूर्णपणे दुटप्पी आहे. आज खरा चेहरा उघड झाला आहे. पेट्रोल डिझेल हे GST मध्ये आणायला या पक्षांनी विरोध केला तर भाजपा आंदोलन करेल. एकीकडे ट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत हे सांगायचं आणि ते भाव कमी करण्याकरीता एक भाव देशात आणण्याकरीता पेट्रोल डिझेल हे GST मध्ये आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आणला. ज्यामुळे २० ते २५ रुपयांनी देखील पेट्रोल डिझेल स्वतं होऊ शकेल. तर त्याला विरोध करायचा. ही दुटप्पी भूमिका आहे. मग कालपर्यंच सायकल घेऊन का निघाले होता, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या