भल्या पहाटेच्या 'त्या' शपथविधीला २ वर्षे पूर्ण; 'तो' VIDEO होतोय जोरदार व्हायरल

भल्या पहाटेच्या 'त्या' शपथविधीला २ वर्षे पूर्ण; 'तो' VIDEO होतोय जोरदार व्हायरल

मुंबई | Mumbai

२३ नोव्हेंबर, २०१९ ची पहाट उगवली तिच एक धक्कादायक राजकीय बातमी घेऊन. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी भाजपने अजित पवार यांना हाताशी धरून भल्या पहाटे अनेकांना धक्का दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उप मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. राज भवनात हा शपथविधी पार पडला होता.

राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीने देशभरात खळबळ माजवली होती. अडीच दिवस टिकलेल्या या सरकारची सर्वत्र चर्चा झाली. पण हा पहाटेचा शपथविधी सोहळा... अन् तो दिवस आजही चर्चेचा विषय आहे. या शपथविधीला आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान या शपथविधी सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेतांना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com